Sunday, May 19, 2024

जेऊर जिल्हा परिषद गटात कर्डिले समर्थकांची मोर्चेबांधणी, यंदा परिवर्तन घडवण्याचा निर्धार

स्वच्छ व पारदर्शी कारभारामुळे विजय निश्चित- गणेश आवारे
शेतकरी ग्रामविकास पॅनलचे जोरदार शक्तिप्रदर्शन
नगर – नगर तालुक्यातील इमामपूर सेवा संस्थेतील स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे मत युवानेते गणेश आवारे यांनी व्यक्त केले.
माजी आमदार शिवाजी कर्डिले गटाच्या वतीने गणेश आवारे यांच्या नेतृत्वाखाली इमामपूर सेवा संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी ग्रामविकास पॅनल निवडणूक लढवत आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ गणेश आवारे, गोविंद जरे (सर), चेअरमन शिवाजी काळे, यशवंत आवारे यांच्या उपस्थितीत फोडण्यात आला. यावेळी शेतकरी ग्रामविकास पॅनल ने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
त्या प्रसंगी बोलताना गणेश आवारे यांनी सांगितले की, इमामपूर सोसायटीमध्ये अनेक वर्षापासून कर्डिले गटाची सत्ता असून स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे आमच्या पॅनलचा विजय निश्चित होणार आहे. सोसायटीमध्ये कधीही दुजाभाव न करता सर्वांना समान वागणूक दिली गेली आहे. स्वस्त धान्य दुकान नफ्यात आले आहे. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना खेळत्या भांडवलाचे वाटप करण्यात आले. विविध कर्ज प्रकरणे व शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात आल्याने मतदार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत असे गणेश आवारे यांनी सांगितले.
यावेळी गोविंद जरे व रभाजी टिमकरे यांनी सेवा संस्थेमार्फत शेतकरी हिताच्या घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. माजी आमदार शिवाजी कर्डिले हे नेहमीच शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेत असतात. त्यामुळे शेतकरी ग्राम विकास पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी भगवान आवारे, ज्ञानदेव मोकाटे, माधव पाटोळे, उद्धव मोकाटे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी ग्राम विकास पॅनल चे सर्व उमेदवार उपस्थित होते.

जिल्हा परिषद गटात परिवर्तन निश्चित
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत जेऊर जिल्हा परिषद गटात निश्चित परिवर्तन होणार असून जेऊर जिल्हा परिषद गटातून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिलेल्या उमेदवाराचा विजय निश्चित होणार आहे. जिल्हा परिषद गटात परिवर्तन होणार असल्याचे चित्र दिसून येत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.
….. गणेश आवारे (युवा नेते)

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles