डॉ. सुनील पोखरणा यांच्यासाठी राज्यपालांनी वापरला विशेषाधिकार, निलंबन रद्द करत पदस्थापनाही दिली

0
1242

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा यांनी ठाकरे सरकारवर कुरघोडी केल्याचं पाहायला मिळतंय. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचं राज्य सरकारकडून निलंबन करण्यात आलं होतं. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी पोखरणा यांचं निलंबन रद्द केलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर करत डॉ. सुनील पोखरणा यांचं निलंबन रद्द केलं आहे. इतकंच नाही तर पुणे जिल्ह्यातील शिरुरच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आलीय. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी समिती स्थापन करुन त्याचा अहवाल सरकारकडे पाठवण्यात आला होता. या अहवालात सुनील पोखरणा दोषी असल्याचे सिद्ध झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.