मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी भाषण करीत विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, आता एक अत्यंत विकृत पद्धत सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन एकमेकांच्या कुंटुंबियांच्या त्रास दिला जातोय. आम्ही जर का तुमच्यासोबत असतो तर तुम्ही आमच्या कुटुंबियांना बदनाम केलं असतं का? ही अत्यंत निच आणि निंदनीय पद्धत, विकृत अशी गोष्ट सुरू आहे. जर मर्द असाल तर मर्दासारखं अंगावर या, मग बघून घेतो. तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करुन, संस्थाचा दुरुपयोग करुन या गोष्टी केल्या जातायंत. शिखंडीच्या मागे राहून धाडी टाकायच्या याला मर्दपणा म्हणत नाहीत,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्ही सगळे इथे बसलेले भ्रष्टाचारी आणि दाऊदची माणसं आहोत. पण तुमचा सकाळचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते की नाही,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी लगावला.
Home ब्रेकिंग न्यूज तुमचा सकाळचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर मलिक, देशमुखांच्या मांडीला मांडी...






