मुंबई: दख्खनचा राजा श्री जोतिबा देवांच्या सेवेत असणाऱ्या सोनू उर्फ उन्मेष नावाच्या अश्वाचे ह्दयविकाराने निधन झाले. हा अश्व गेल्या दोन दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर वारणानगर येथील पशुवैद्यकीय डॉक्टर व गोकूळ दूध संघाच्या पशुवैद्यकीय तज्ञांकडून उपचार सुरू होते. त्यास ह्दयविकाराचा झटका आला. त्यात त्याचे निधन झाले. अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मंदिराच्या दक्षिण दरवाजा परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथील हिंमत बहादुर चव्हाण कुटुंबाने मार्च २०१२ मध्ये हा दख्खन उर्फ उन्मेष नावाचा मानाचा अश्व देवाच्या चरणी अर्पण केला होता. या कुटुंबाने यापूर्वी १९६२ मध्ये ही एक अश्व अर्पण केला होता. तो १९७५ पर्यंत होता. कालांतराने अनेक भाविकांनी जोतिबा डोंगरावर श्री चरणी अर्पण केले होते. २०११ मध्ये सोनू नावाच्या मानाच्या अश्वाचा ही आकस्मित मृत्यू झाला होता. हा पांढऱ्या शुभ्र रंगाचा घोडा मागच्या दहा गेल्या दहा वर्षापासून डोंगरावर तो श्री सेवेत होता.
मंदिर परिसरातच या घोड्याची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.त्याच्या देखरेखीसाठी सेवक देखील नेमण्यात होता. प्रत्येक पालखी सोहळ्याला या घोड्याची हजेरी क्रमप्राप्त असायची. काही भाविक जोतिबाचे दर्शन घेतल्यानंतर घोड्याचा देखील दर्शन घ्यायला तबेल्यात जात असतं.