मुंबई: विरोधकांना नामोहरम करण्याचा कट कसा रचला जातोय हे उघड करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करा,” अशी मागणी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना आमदार आशिष शेलार यांनी, “हा महाभयंकर कट असून देवेंद्र फडणीस यांनी सादर केलेल्या पुराव्यात बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा वापर, पोलीस यंत्रणाचा गैरवापर या सर्व बाबींचे धागे-दोरे एकमेकांशी गुंतलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा कट देखील उलगडला आहे. एकूण पाहता हा महाभयंकर कट दिसत असल्याने फडणवीस यांची सुरक्षा तात्काळ वाढवावी,” असं म्हटलंय.






