देहू येथील कार्यक्रमात अजितदादांना भाषणाची संधी नाही, खा. सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीत नाराजी

0
998

देहूमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी व्यासपीठावर उपस्थितीत असलेल्या नेत्यांपैकी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे या तिघांची भाषणे झाली. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव भाषणासाठी न पुकारल्यामुळे आता कार्यक्रमाच्या संयोजक समितीवर टीका होते आहे.

ही खूप दुर्दैवी आहे. हा महाराष्ट्राचा आणि पुण्याचा अपमान आहे.  अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते आहे. पण ते आधी राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. महाराष्ट्र सरकारने विनंती पाठवली होती. पण ती केंद्र सरकारने नाकारली होती. देवेंद्र फडणवीस यांना संधी देण्यात आली आहे. शेवटी देवेंद्र फडणवीस यांना संधी द्यायची की नाही हा पंतप्रधान कार्यालयाचा प्रश्न आहे. जर विरोधी पक्षनेत्यांना संधी दिली जात असेल तर अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. त्यांना संधी देत नाही, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, हे खूप दुर्दैवी आहे. इतक्या कोत्या मनाचे असतील हे पहिल्यांदाच राजकारणात होत आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.