नगर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना नगर जिल्ह्यासाठी मोठी घोषणा केली आहे.
200 खाटांच्या सर्व रुग्णालयांमध्ये येत्या तीन वर्षात लिथोट्रिप्सी उपचार पद्धती सुरु करणार. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आधुनिक “फेको” उपचार पद्धती सुरु करणार. 50 खाटांच्या रुग्णालयांना यांत्रिक धुलाई संयंत्रे व 30 खाटांवरील रुग्णालयांना स्वच्छता यंत्रे देणार. मोबाईल कर्करोग निदान वाहनांची सुविधा देणार. हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सांगली , सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर ,रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालये स्थापन करणार.