Sunday, May 19, 2024

नगर शहरातील महिलेच्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पकडले

नगर शहरातील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पकडले
नगर- नगर शहरातील लालटाकी येथील महिलेचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी येथे पडकले आहे. संतोष बबन भारस्कर (वय 41, रा.लालटाकी, नगर) असे आरोपीचे नाव आहे.
लालटाकीच्या भारस्कर कॉलनी येथील माया वसंत शिरसाठ यांची बहिण भारती दीपक आव्हाड (रा.पाथर्डी) व शिरसाठ यांच्या शेजारी राहणारे सारिका संतोष भारस्कर याचे नातेवाईकांचे पाथर्डी येथे भांडणे झाली होती. या कारणावरुन दि.10 एप्रिल 2019 रोजी दुपारच्या वेळी सारिका संतोष भारस्कर व त्यांचे नातेवाईक असलेले नितीन विक्रम दिनकर, विक्रम लहानू दिनकर, मुकेश विष्णू दिनकर व इतर 14 ते 15 जणांनी फिर्यादी माया शिरसाठ तसेच त्यांची सासू बेबी अर्जुन शिरसाठ, दीर सचिन शिरसाठ, विनोद शिरसाठ, संतोष शिरसाठ यांना लाकडी दांडके, चाकू, तलवारीने मारहाण केली होती. या मारहाणीत बेबी अर्जुन शिरसाठ यांचा मृत्यू झाला होता.
याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संतोष भारस्कर हा आरोपी तेव्हापासून फरार होता. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेत असताना पो.नि. अनिल कटके यांना आरोपी भारस्कर हा पाथर्डी येथे आला असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीवरुन त्यांनी एक पथक कारवाईसाठी पाठवले. या पथकातील साहायक फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पो.हे.कॉ. बापूसाहेब फोलाणे, पो.ना. भीमराज खर्से, देवेंद्र शेलार यांच्या पथकाने पाथर्डीला जावून फरार आरोपी संतोष भारस्कर यास पकडले. त्याला पुढील कारवाईसाठी तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles