नगर शहरासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुद, आ.संग्राम जगताप यांचा यशस्वी पाठपुरावा

0
535

नगर शहरासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठया प्रमाणात निधी दिला आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. या निधीतून रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

आ. जगताप म्हणाले की, भिंगारनाल्यावरील पूलाचे काम पूर्वीच केले आहे. सीना नदीवरील पुलासाठी 4 कोटी 88 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. बुरूडगावमधील बाबर मळा येथील जुन्या पुलासाठी 2 कोटी, मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रूग्णालयाचे स्ट्रक्चरल ऑडीट झालेले आहे. अमृत भुयारी योजना अंतिम टप्यात असून एसडीपी प्लँट उभारण्यात येत आहे. स्वस्तीक चौक ते आनंदऋषी महाराज समाधी पर्यंतच्या रस्त्यासाठी 5 कोटी, महात्मा फुले चौक ते भिंगारनाला रस्त्यासाठी मनपाच्या माध्यमातून 2 कोटी 50 लाख, तसेच काटवन खंडोबा ते आगरमळा रस्त्यासाठी 8 कोटी 50 लाख, सोलापूर रस्त्यावरील कानडे मळा ते अहमदनगर कॉलेजवळील एमएसईबी कार्यालयपर्यंतच्या रस्त्यासाठी 3 कोटीचा निधी प्रस्तावित आहेत. हे रस्ते नाशिक विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी गेले आहेत. नाशिक येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रूग्णालयाच्या निधीस मंजुरी दिली आहे. राज्य सरकारकडून अंतिम मंजुरी मिळालेली असून त्यासाठी 26 कोटी 70 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे. बुरूडगाव प्रभाग कार्यालय परिसरात हे रूग्णालय उभारण्यात येणार आहे. केडगावमधील अर्चना हॉटेल चौक ते नेप्तीबाजार पर्यंतच्या रस्त्यासाठी 15 कोटी 60 लाख, केडगाव भागातील लिंकरोडकडून कल्याण रस्त्याकडे जणार्‍या रस्त्यासाठी 22 कोटी, बुरूडगावकडे जाताना भिंगारनाला व सीना नदीवरील पूल असे दोन पूल आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे शहरात मुझीकल फाऊंटनसाठी पाठपुरावा केला. बुरूडगाव रस्त्यावरील साई उद्यान येथे मुझीकल फाऊंटनसाठी जिल्हा नियोजन मंडळातून 1 कोटी 22 लाखाचा निधी मंजूर झाला आहे.माळीवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते माळीवाडा वेस दरम्यानच्या रस्त्यासाठी 1 कोटी, सोलर पॉवर प्रोजेक्टसाठी 10 कोटी, बुरूडगाव येथे सोलर पॉवरसाठी 2 कोटी 50 लाख, अमरधाम येथील सोलर पॉवरसाठी 1 कोटी 50 लाख मंजूर झाले आहेत.