नगर: पाईपलाइल रोडवरील पत्रा मार्केटवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी हातोडा उगारला आहे. जवळपास २५ ते ३० दुकाने पूर्णतः काढून टाकण्यात आली आहेत.
पाईपलाईन रस्त्यावर यशोदा नगर परिसरात कडेला गेल्या काही दिवसांपासून पत्र्याची अनधिकृत गाळे उभारण्यात आले होते. याच दुकानापुढे वाहने उभी केली जात असत. कोणतीही परवानगी असलेले हे गाळे कसे उभारण्यात आले, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता.
महापालिकेने संबंधितांना याबाबत नोटिसा देऊन दुकाने काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र वारंवार सांगूनही त्याचा फारसा परिणाम होत नव्हता. सतत किरकोळ अपघातामुळे या रस्त्यावर गर्दीच्या वेळी वाहन चालविणेहीही कठीण झाले होते. या रस्त्याच्या नुतनीकरणाचे कामही महापालिकेने हाती घेतले आहे. त्यालाही या अतिक्रमणांचा अडथळा येत होता. या सर्व बाबींचा विचार करून महापालिकेने मंगळवारपासून या दुकानांवर कारवाईचा बडगा उगारला.