पुणे मेट्रोचा प्रवास…. देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केला खास व्हिडिओ

0
921

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बहुचर्चित अशा पुणे मेट्रोचे उद्घाटन पार पडले. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास व्हिडिओ प्रसारित करीत पुणे मेट्रोचा प्रवास उलगडून दाखविला. फडणवीस यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी कार्यसंस्कृती बदलली. आता चर्चा नाही. आता प्रकल्प होत आहेत. पुणे मेट्रोचं खरं श्रेय कुणाला द्यायचं असेल तर ते मोदींना द्यायचं आहे. आम्ही तर सैनिक आहोत. मुळातच राज्यामध्ये आम्ही सत्तेत आल्यानंतर एक मोठा कंसेंन्स केल्याशिवाय त्याला मान्यता मिळू शकत नाही. मेट्रो अंडरग्राउंड करायची की एलिव्हेटेड करायची . हा कॉरिडॉर घ्यायचा कि तो कॉरिडॉर घ्यायाचा असे अनेक प्रश्न होता. या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात बैठका आम्ही घेतल्या. मुख्यमंत्री म्हणून मी बैठका घेतल्या. नितीनजी आले त्यांनी बैठका घेतल्या. त्यातून एकमत तयार करण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी एकमत होताना दिसत नाही. तिथे राज्यकर्त्यांना रेटून न्यावे लागते. तश्या प्रकारे आराखडा आम्ही तयार केला. त्यातही जमीन अधिकाग्रहणाच्या , अलाईनमेंटचे प्रश्न होते. ते सर्वप्रश्न आम्ही सोडवले.