Monday, May 20, 2024

पेटीएम पेमेंट्सला नवीन ग्राहकांची नोंदणी करण्यास बंदी… रिझर्व्ह बँकेचे आदेश

रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्सला नवीन ग्राहकांची नोंदणी करण्यास बंदी घातली आहे. रिझर्व्ह बँकेला पेटीएम पेमेंट्स बँकेबाबत चिंताजनक माहिती समोर आल्यानं बँकंन हा आदेश जारी केला आहे. पेटीएम पेमेंट्सला आयटी सिस्टीमचे तातडीनं ऑडिट करण्याच्या सूचना देखील जारी केल्या आहेत. नव्या आयटी फर्म द्वारे पेटीएम पेमेंट्स बँकेचं आयटी ऑडिट केलं जाणार आहे. रिझर्व्ह बँकेला अहवाल सादर केल्यानंतर पेटीएम पेमेंट्सच पुढील भविष्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. रिझर्व्ह बँकेने तत्काळ प्रभावानं निर्णय लागू केल्यामुळं अर्थजगतात खळबळ माजली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा डिजिटल बँकिंग यंत्रणेतील व्यवहारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

पेटीएम पेमेंट्स बँक ही जानेवारी महिन्यामध्ये 926 मिलियन्सहून अधिक यूपीआय व्यवहारांचा टप्पा पार करणारी पहिली बँक ठरली होती.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles