पिंपरी चिंचवडमध्ये आगामी महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांनी राजीनामा देण्याचे सत्र सुरु ठेवले आहेत. आज भाजपाच्या आणखी दोन नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. भोसरी प्रभागाचे बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे,चिखली प्रभागाचे नगरसेवक संजय नेवाळे यांनी राजीनामा दिला आहे. पिंपरी चिंचवड भाजपमधील आतापर्यंत सहा नगरसेवकानी दिले आहे.सुरुवातीला भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी भाजपाला रामरामकरत उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले. त्यानंतर चिंचवड विधानसभेचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरसेविका चंदा लोखंडे यांनीही आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नगरसेवक तुषार कामठे यांनी आपला राजीनामा सोपवला. त्यानंतर आता या दोघांनी आपला राजीनामा आयुक्तांकडे सोपवला आहे. हे दोन्ही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर मात्र भूमिका दोन दिवसांनी स्पष्ट करणार असल्याची माहिती समोर आली आहे.