मुंबई:बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गणेशकाका जगताप व त्यांचे सहकारी यांनी आज भाजप प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री बाळा भाऊ भेगडे, आमदार भीमराव आण्णा तापकीर, डॉ. अनिल बोंडे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, जालिंदरभाऊ कामठे, वासुदेव नाना काळे, आशाताई बुचके, नंदुशेठ शर्मा, अनिल मेहेर, आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.