बाजारपेठेत ‘शहाजीराजे भोसले मार्ग’ नामकरण फलकाचे अनावरण

0
475

बाजारपेठेत ‘शहाजीराजे भोसले मार्ग’ नामकरण फलकाचे अनावरण

शहराचा इतिहास जोपासू – उपमहापौर गणेश भोसले

जन्मदिवसाचे औचित्य साधून नामकरण फलकाचे नवी पेठ कॉर्नरवर अनावरण

अहमदनगर प्रतिनिधी – नगर शहराला 500 वर्षाचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या पराक्रमाचा इतिहास या परिसराला लाभलेल्या आहे. सर्वांनी यापुढे आता घास गल्ली असा उल्लेख न करता या परिसराला असलेले नाव शहाजीराजे भोसले मार्ग असा उल्लेख नागरिकांनी करावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून नवीपेठ व कापड बाजार येथे आकर्षक फलक बसविण्यात आले आहेत शहराला शहाजीराजे भोसले यांचा वारसा लाभला आहे ज्या ठिकाणी शहाजी राजांचे वास्तव्य होते त्या भागाची ओळख नागरिकांना व्हावी तसेच भावी पिढीला इतिहासाची ओळख व्हावी यासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे आपण आपला महान इतिहास विसरत चाललो आहे छत्रपतींचा इतिहास जोपासणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे आपल्या शहराचा इतिहास मोठा आहे याची उजळणी करण्याचे काम आपण सर्वजणांनी करावा असे प्रतिपादन उपमहापौर गणेश भोसले यांनी केले.
शहरातील नवी पेठ व कापड बाजार येथील शहाजीराजे भोसले मार्ग नाम फलकाचा अनावरण सोहळा उपमहापौर गणेश भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी मा. विरोधी पक्ष नेता संजय शेंडगे, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम,मा.नगरसेवक संजय चोपडा, नगरसेवक प्रकाश भागानगरे, विनित पाऊलबुधे, निखिल वारे,बाळासाहेब पवार, संतोष गांधी, सुशील भंडारी, रमेश भंडारी, महेश गुगळे, मनीष लोढा, सतीश देसरडा, श्रेनिक लूनावत, ठाकूर परदेशी,पंकज मेहर, मारुती गुंजकर, अक्षय टेमकर, मोनाली ठोंबरे, स्वीटी जाधव, सुरेश कपाळे, अमित गायकवाड, अनिरुद्ध चिंचणे, अश्विन सातपुते, अंबादास गाजुल आदी उपस्थित होते.
नगर ट्रेकर्सच्या सदस्यांनी उपमहापौर गणेश भोसले यांची भेट घेऊन नगर शहराला मोठा इतिहास लाभलेला आहे शहाजीराजांनी नगर मध्ये वास्तव्य केले आहे त्यांच्या नावाचा फलक त्या ठिकाणी लावावा अशी मागणी केली होती त्याची दखल घेत उपमहापौर गणेश भोसले यांनी सदर नामफलक लावण्यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार आज शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीचे औचित्य साधून नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
रायगड कन्स्ट्रक्शनचे संचालक अश्विन सातपुते यांनी या आकर्षक नामफलकाचे काम केले आहे.