बाळासाहेब थोरात विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत!

0
816

शिवसेनेच्या गोटात भूकंपाचे हादरे बसत असतानाच आता काँग्रेसमध्येही धुसपूस सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर नाराज झालेले राज्याचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठे हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे.
हसूलमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात पक्षाच्या विधिमंडळातील गटनेतेपदाचा राजीनामा देणार. विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतरचे पडसाद. थोरात दिल्लीला रवाना, आमदारांनी पक्षादेश पाळला नाही, विसंवादामुळे पराभव. अशा कारणातून थोरात पद सोडण्याची शक्यता.