Monday, May 20, 2024

भाजपचे माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर…पक्ष प्रवेशाचा मुहूर्त निश्चित!

सांगली: राष्ट्रवादी पक्षाचे नेते व माजी कृषिमंत्री शरद पवार व शिराळचे भाजपाचे माजी आमदार व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे यशवंतराव चव्हाण स्मृति सदनमध्ये बैठक झाली. या बैठकीत पक्ष प्रवेशाबद्दल सकारात्मक चर्चा होऊन त्यावर शिक्कामोर्तब झाला. २ एप्रिलला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिराळा येथे होणाऱ्या शिवाजीराव नाईक यांच्या राष्ट्रवादीपक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमास स्वतः उपस्थित राहण्याची तयारी शरद पवार यांनी दर्शवली आहे. या बैठकीने नाईक यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles