Monday, May 20, 2024

भाजप आमदार श्वेता महालेंसह अनेकांवर गुन्हे दाखल

भाजप आमदार श्वेता महालेंसह अनेकांवर गुन्हे दाखल, विनापरवानगी मोटारसायकल रँली काढल्याप्रकरणी कारवाई

बुलढाणा : शिवजयंती निमित्त चिखली शहरातून शनिवारी महिलांची भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. परंतु या रॅलीच्या माध्यमातून साथरोग नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि विनापरवानगी रॅली काढली म्हणून भाजप आमदार श्वेता महाले यांच्यासह सुमारे 30 ते 35 जणांवर चिखली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये भाजप आमदार श्वेता महाले जिल्हा परिषद सदस्या डॉ. ज्योती खेडेकर, माजी नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे, माजी नगरसेविका संगिता गाडेकर, मीनल गावंडे, नेहा खरात, तेल्हारा ग्राम पंचायत सरपंच किरण गाडेकर, विजया खडसन, सुरेखा पडघान, मनीषा सपकाळ यांच्यासह अनिकेत सावजी, अमोल खेडेकर यांच्यासह इतर 30 ते 35 स्कूटी चालक महिलांचा समावेश आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles