मटका व्यावसायिकाची हत्या इमारतीच्या छतावर मृतावस्थेत

0
780

मटका व्यावसायिकाची साताऱ्यात हत्या, इमारतीच्या छतावर मृतावस्थेत

सातारा : मटका व्यावसायिकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डोक्यात गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आल्याचं समोर आहे. इमारतीच्या छतावर व्यावसायिक मृतावस्थेत आढळला. सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील फुल मळा परिसरात हा प्रकार घडला. लेक पॅलेस अपार्टमेंटच्या छतावर व्यावसायिकाचा मृतदेह सापडला होता. रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मटका व्यावसायिकाची हत्या झाल्याचा आरोप आहे. मयत व्यक्ती हा पुण्यातील मटका व्यावसायिक असल्याची माहिती आहे. त्याची हत्या नेमकी कोणी आणि कुठल्या कारणासाठी केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मटका व्यावसायिकाची डोक्यात गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संजय सुभाष पाटोळे (रा. बिबवेवाडी, पुणे) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. इमारतीच्या छतावर व्यावसायिक मृतावस्थेत आढळला.