नगर: नगर शहरातील अंतर्गत रस्ते माळीवाडा, माणिक चौक, कापड बाजार, तेलिखुंट, नवीपेठ, नेता सुभाष चौक, चितळे रोड या रस्त्यांवर युतीचे सरकार असताना 10 कोटी रुपये पीडब्ल्यूडी कडे वर्ग झाले असून यासंदर्भात पीडब्ल्यूडी अधिकारी यांची भेट घेऊन शिवजयंतीच्या आत हे सर्व रस्ते पूर्ण करावे असे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले. यावेळी युवा सेनेचे विक्रम राठोड, माजी शहरप्रमुख दिलीप दादा सातपुते, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, रमेश खेडकर, दत्तात्रय नागपुरे, ऋषिकेश सामल शिवसैनिक उपस्थित होते.