मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेने सभासदांच्या वैद्यकीय उपचारासाठी केले धनादेशाचे वाटप

0
285

सभासदांना आरोग्य आपत्ती उद्भवल्यास पतसंस्था देणार मदतीचा हात – चेअरमन बाळासाहेब गंगेकर

अहमदनगर प्रतिनिधी – मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेत सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून संचालक मंडळ काम करीत असल्यामुळे सभासदांनी मोठ्या विश्वासाने सर्व संचालक मंडळ निवडून दिले आहेत. सभासदांवर आरोग्याची आपत्ती ओढवल्यास पतसंस्था तातडीने मदतीचा हात देत असते सभासद कृष्णा शंकर बिचकुले यांना तातडीने वैद्यकीय उपचाराची गरज असल्याचे ओळखून पतसंस्थेने तातडीने आरोग्यसेवेसाठी २५ हजार रुपयाचा धनादेश त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला आहे. मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या सभासदांवर दुर्धर आरोग्य आपत्ती उद्भवल्यास पतसंस्था त्याच्या उपचारासाठी तातडीने उभी राहणार असल्याचे प्रतिपादन चेअरमन बाळासाहेब गंगेकर यांनी व्यक्त केले.
मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा सभासद कृष्णा शंकर बिचकुले याच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडे 25 हजार रुपयांचा धनादेश देतांना चेअरमन बाळासाहेब गंगेकर समवेत व्हा.चेअरमन प्रमिलाताई पवार, संचालक बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, सतिष ताठे, विकास गीते, श्रीधर देशपांडे, विजय कोतकर, गुलाब गाडे, अजय कांबळे, बाळासाहेब पवार, किशोर कानडे, कैलास चावरे,सोमनाथ सोनवणे, संचालिका उषाताई वैराळ,कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी आदी उपस्थित होते.
सभासद कृष्णा शंकर बिचकुले यांच्या कुटुंबीयांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, वेळेवर व गरजेच्या वेळी धावून येणारी मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्था आहे त्यामुळे मी माझ्या पतीवर पुढील उपचार करू शकले अशा भावना कुटुंबीयांनी व्यक्त केल्या.