मुंबई-मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा मागणीची ४००० पोस्टकार्डस आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे रवाना करण्यात आली. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली आयोजित जनअभियानांतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला.