मलिकांविरोधात भाजपची स्वाक्षरी मोहिम, विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनीही केली सही

1
768

आज विधानभवनात भाजपाच्या वतीने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहीम राबवली गेली. यावेळी भाजपच्या आमदारांनी स्वाक्षरी केल्या. मात्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी देखील यावर स्वाक्षरी केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. विधानभवनाच्या पायऱ्यांच्या शेजारी असलेल्या डायसवर भाजप नेते आपल्या सह्या करत होते. यावेळी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ तिथं आले. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी नरहरी झिरवाळ यांना सही करण्यासाठी पेन दिला आणि त्यांनी सही केली.

याबाबत बोलताना मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पायऱ्यांवर इतका गोंधळ असतो की माणूस गोंधळून जातो. नरहरी झिरवळ ही साधी व्यक्ती आहे. आदिवासी समाजातून आलेली व्यक्ती आहे. कारण नसताना त्यांना घेरण्याचं काम करू नये, असं आव्हाड म्हणाले.

1 COMMENT

  1. विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत झिरवाळ साहेब
    तरीही आव्हाड साहेब म्हणतात की आदिवासी समाजातून आलेले आहेत माणूस एवढ्या मोठ्या पदावर
    असूनही त्यांना आदिवासी म्हणणं चुकीचं आहे.

Comments are closed.