आम्ही सिस्टीमचे विकेंद्रीकरण करतो. मात्र आता एकही नगरसेवक नाहीत. किती महिने म्हणतो प्लिज निवडणूक घ्या. पण कदाचित सी व्होटरचा सर्वे आलाय. त्यात महाविकास आघाडीचे 30 खासदार निवडून येण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच भाजप लॉन्ड्री आणि शिंदे गटाचे 18 खासदार निवडून येतील असं दाखवण्यात आलं आहे. या शिवाय विधानसभा निवडणुकीत मविआचे आमदार 160 च्या जातील असा सर्व्हे आहे. या सर्व्हेमुळेच निवडणुका लेट केल्या जात आहेत, असा दावा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्या पत्रकारांशी संवाद साधत होत्या.
सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटावरही जोरदार हल्ला चढवला. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केला. त्यांचा उत्तराधिकारी त्यांनीच ठरवला. त्यावेळी हा उत्तराधिकारी सर्वांना मान्य होता. आता बाळासाहेबांच्या निर्णयाला तुम्ही चॅलेंज करताय का?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.






