अहमदनगर जिल्हा सलून चालक-मालक संघटनेच्या बैठकीत 15 मे 2022 पासून कटिंग व दाढीच्या दरात भाववाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीत सलूनच्या दरवाढी संदर्भात निर्णय घेण्यात आला. दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, त्याचबरोबर सलून मटेरिअलचे वाढलेले दर यामुळे सलून चालक मेटाकुटीस आले आहेत. सलून निगडित मटेरियल, वीज बिल अशा अनेक महागाईच्या संकटाशी तोंडमिळवणी करण्यासाठी व तसेच वाढत असलेली महागाई व सलूनचे दर यात ताळमेळ बसत नसल्याने नाईलाजास्तव दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार झालेल्या बैठकीत कटिंगसाठी 130 रुपये व दाढीसाठी 70 रुपये दर येत्या 15 मे 2022 पासून लागू करण्यात येणार आहेत. सर्व सलून व्यावसायिकांनी एक सारखे दर आकारावेत आणि ग्राहकांनीही सहकार्य करावे असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.
बैठकीस ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील वाघमारे, जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत, महाराष्ट्र कार्यकारिणीचे विलास मदने, कार्यकारिणी सदस्य विकास मदने, अहमदनगर जिल्हा सलून चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष जनार्दन वाघ, उपाध्यक्ष सत्तार अली, अजय कदम, सदस्य संजय मदने, शरद दळवी, किशोर मोरे, विशाल मदने, विनोद साळुंके, अरुण वाघ, नवनाथ मदने, जनार्दन शिंदे, शहाजी कदम, शिवाजी दळवी, अनिल कदम आदींसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.