महानगरपालिकेचे ८०२ कोटीचे अंदाजपत्रक ‘स्थायी’स सादर

0
603

अहमदनगर महानगरपालिकेचे सन २०२२-२३ चे ८०२ कोटीचे मुळ अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती कुमार वाकळे यांचेकडे आयुक्त शंकर गोरे यांनी सादर केले.
सादर केलेल्या अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न रु. ३७३ कोटी ९१ लाख, भांडवली जमारु. ३७२ कोटी ०४ लाख धरणेत आले आहे. महसुली उत्पन्नात संकलीत करापोटी रु. ५१ कोटी
२२ लाख, संकलीत करावर आधारीत करापोटी ६७ कोटी २१ लाख, जी एस टी अनुदान १११
कोटी ६७ लाख व इतर महसुली अनुदान रु. २७ कोटी ६५ लाख, गाळा भाडे ३ कोटी,
पाणीपट्टी २६ कोटी ४० लाख, मिटरद्वारे पाणी पुरवठापोटी ४२ कोटी, संकीर्णे २४ कोटी ८०
लाख़ इ. महत्वाच्या आहेत. तसेच भांडवली कामांवर अनुदान, कर्ज व मनपा हिस्सा धरुन रु.
३७२ कोटी ०४ लाख अंदाजित जमा होणार आहेत.
तसेच खर्च बाजूस वेतन, भत्ते व मानधनावर १२६कोटी ३६ लाख, पेन्शन ४२ कोटी व ७७
लाख, पाणी पुरवठा विज बिल ३३ कोटी, स्ट्रीट लाईट विज बिल ३ कोटी, शिक्षण मंडळ वर्गणी
४ कोटी ३० लाख, महिला व बाल कल्याण योजना १ कोटी ६० लाख, अपंग पुनर्वसन योजना
१ कोटी ६० लाख, मागासवर्गीय कल्याणकारी योजना ५ कोटी २५ लाख, मा. सदस्य मानधन
१ कोटी ५० लाख, औषधे व उपकरणे १ कोटी, मा. सदस्य प्रभाग स्वेच्छानिधी ७ कोटी ४७
लाख, कचरा संकलन व वाहतूक ३ कोटी ,पाणी पुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती ६० लाख,
टँकरद्वारे पाणी पुरवठा व तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदी कोटी ७० लाख, अशुध्द पाणी
आकार २ कोटी, विविध वाहने खरेदी २ कोटी ३०, नविन रस्ते १५ कोटी, रस्ते दुरुस्ती १२
कोटी, इमारत दुरुस्ती ५० लाख, शहरातील ओढ नाले साफसफाई ४५ लाख, आपत्कालीन
व्यवस्थापन ४० लाख, कोडवाड्यावरील खर्च २० लाख, वृक्षारोपन तदनुषंगिक खर्च ८५ लाख,
हिवताप प्रतिबंधक योजना ४० लाख, कचरा डेपो सुधारणा व प्रकल्प उभारणी ४१ लाख,
मोकाट कुत्री व जनावरे बंदोबस्त १ कोटी ३५ लाख यासह इतर बाबींबर खर्च प्रस्तावित केलेला
आहे.
शहरवासियांना चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी नविन रस्ते व रस्ते दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच आरोग्य, विज,
पाणी या सेवा चांगल्या दर्जाच्या देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.