माझ्यावर आणि धनंजय मुंडेंवर चित्रपट बनवल्यास तो खुप हिट होईल

0
1859

करुणा शर्मा यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणुक लढवण्याची घोषणा केली आहे. त्या त्यांच्या शिवशक्ती सेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार असतील. करुणा शर्मा मुंडे या निवडणुकीच्या तयारीला लागल्या असून त्या एका वक्तव्यामुळे सध्या चांगल्याच चर्चेत आहेत.

“चित्रपट काढायचा असेल तर सर्वात मोठा विषय मीच आहे, करुणा धनंजय मुंडे. महाराष्ट्रातलं राजकारण कसं आहे आणि इथली नेतेमंडळी कशी आहे, इथल्या सर्वसामान्य लोकांची काय स्थिती आहे हे मला माहीत आहे. मी गेल्या २५ वर्षांपासून राजकारण पाहत आले आहे. ४३ वर्ष हे राजकारणात यायचं वय नाही. २२-२५ व्या वर्षी राजकारणात आले असते तर माझं भविष्य राजकारणात असतं. पण मी किती जगेल हे माहीत नसतानाही राजकारणात यायचं आणि लोकांसाठी आवाज उठवण्याचं कारण म्हणजे मी घरात गेल्या २५ वर्षांपासून राजकारण पाहिलंय. त्यामुळे माझ्यावर आणि धनंजय मुंडेंवर चित्रपट बनवल्यास तो खुप हिट होईल, असं करुणा शर्मा मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.” तसेच आपल्याला कोणाचीही भीती वाटत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.