Thursday, May 16, 2024

मूलबाळं नसणारांना त्यांच्या वेदना कळणार नाही, युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणीवरुन नाना पटोले यांचे वक्तव्य

मुंबई: रशिया युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांच्या वेदनांबाबत बोलताना, ज्यांना मुलं बाळं नाही अशा लोकांना त्यांच्या वेदना कळणार नाही ,असे वक्त्यव्य नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केले आहे. युक्रेनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी अडकून आहेत मी स्वतः त्या विद्यार्थ्यांशी फोन वर बोललो, त्यांचे व्हिडियो पाहिले. भारताच्या विदेश मंत्रालयाशी मी अनेकदा बोललो असून त्याच्या कडून कोणतेही प्रतिसाद मिळाले नाही. असा आरोपही पटोलेंनी केला आहे.
भाजपवर टीका करताना नाना पटोले म्हणाले, ज्याप्रमाणे कोरोनामध्ये पाच राज्याच्या निवडणुका दुसऱ्या लाटेत आल्या तेव्हा भारताचे प्रधानसेवक आहेत ते प्रचारात व्यस्त होते. आणि दुसरीकडे प्रेतं गंगा नदीत तरंगताना दिसताच त्यांना जाग आली. त्याचप्रमाणे पुन्हा आता पाच राज्यांच्या निवडणुका सुरु झाल्या आणि या निवडणुकामध्येच युक्रेनमध्ये युद्ध सुरु होणार होते असे रशियाच्या माध्यमातून सगळीकडे अल्टिमेट दिले जात होते. तेव्हाही भारताचे प्रधान सेवक निवडणुकीत व्यस्त होते. मात्र युद्धा आधीच युक्रेन मध्ये असलेल्या बाकी देशांच्या विध्यार्थाना त्यांच्या देशांनी त्यांना स्वदेशात घेऊन जाण्याची सोय केली असल्याचे तिथे अडकलेल्या विध्यार्थानी सांगितले आहे. मात्र आपल्या देशातून कुठली मदत आपल्या देशातील युक्रेन मध्ये अडकलेल्या विध्यार्थाना मिळालेली नाही . असा आरोप त्यांनी केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles