राज्यात लवकरच साडेसात हजार पोलिसांची भरती; मुख्यमंत्र्यांची घोषणा

0
383

राज्यात नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने सत्तास्थापन होताच अनेक निर्णयांचा धडका लावला आहे. त्यातच औरंगाबाद दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. पुढील काही महिन्यात राज्यात तब्बल साडेसात हजार पोलिसांची भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. औरंगाबाद दौऱ्यातील एका कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्या भाषणातून त्यांनी ही घोषणा केली आहे.