मुंबई आमदार नितेश राणे त्यांनी हिंदुह्रदयसम्राट यावरुनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, ‘खरं म्हटले तर आपण काही लोकं हिंदुह्रदयसम्राट असल्याचे बॅनरसहित फोटो लावतात. पण तुम्ही माझी भावना विचारली तर खरा हिंदूह्रदयसम्राट ही पदवी अगर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनंतर कुणाला द्यायची असेल तर ती देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी असं माझं म्हणणं आहे. कारण त्या एका पत्रकार परिषदेनंतर राष्ट्र आणि राज्य वाचवायचे काम केलंय. अहो आपण ज्या राज्यामध्ये फिरतोय, ज्या मुंबईमध्ये राहतोय, तुम्ही तर ज्या मतदार संघात मतदान करताय, राहताय, जगताय तिकडचाच आमदार मंत्री म्हणून जर अंडरवर्ल्डचा दाऊद, त्याच्या सगळ्या लोकांबरोबर व्यवहार करत असेल त्याचे पैसे ठेवत असेल त्याच्या पैशामुळे प्रॉपर्टी घेत असेल आणि त्या प्रॉपर्टीच्या पैसे घेतल्यानंतर मुंबईतून बॉम्ब ब्लास्ट होत असतील तर आपल्या आयुष्याची गॅरेंटी कोण देणार तुम्ही सांगा मला?






