लग्नाचे आमिष दाखवुन तरूणीवर अत्याचार केला. अत्याचाराचे मोबाईलमध्ये चित्रिकरण करून वेळोवेळी पैशाची मागणी केली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार करणार्या तरूणाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरूणीने फिर्याद दिली आहे. गणेश शिंदे (रा. शिंदे मळा, बालिकाश्रमरोड, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.
अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्या तरूणीची 13 वर्षांपूर्वी गणेश सोबत ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. गेल्या 10 महिन्यांपूर्वी गणेशने फिर्यादी तरूणीला त्याच्या घरी बोलवून लग्नाची मागणी घातली. त्या मागणीला तरूणीने होकार दिला. तेव्हा गणेशने माझ्या इच्छेविरूध्द संबंध केले व त्याचे मोबाईलमध्ये चित्रकरण केले असल्याचे तरूणीने फिर्यादीत म्हटले आहे. संबंधाचे केलेले चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत गणेशने तरूणीकडे पैशाची मागणी केली.