पदभार स्वीकारल्यानंतर विजय औटी यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट…

0
1155

नगर: पारनेर नगर पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवल्यानंतर आमदार निलेश लंके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. ,यावेळी पवारांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष.विजय औटी आणि उपनगराध्यक्ष सौ.सुरेखाताई भालेकर यांचा सत्कार केला व नूतन पदाधिकारी आणि सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.आगामी काळात पारनेर शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही अर्थ व नियोजन मंत्री या नात्याने पवार यांनी दिली.