Saturday, May 18, 2024

नवाब मलिकांनी दाऊदच्या बहिणीला ५५ लाख रुपये दिल्याचे पुरावे, फडणवीस यांचा गंभीर आरोप

मुंबई : ईडीने राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिकांवर केलेल्या कारवाईचे भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले आहे. देशाच्या शत्रूसोबत मलिक यांनी जमीन खरेदी व्यवहार केला असून त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला ५५ लाख रुपये दिल्याचे ईडीकडे पुरावे आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकारने चालढकल न करता मलिकांच्या मंत्रीपदाचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

ते म्हणाले, देशाच्या गद्दारांसोबत व्यवहार करणे गंभीर गोष्ट आहे. ईडी आणि एनआयएने गेल्या काही दिवसांमध्ये जॉईंट ऑपरेशन केली असून यातुन ईडीला 9 ठिकाणी सर्च ऑपरेशन मधून लिंक्स मिळाली आहे. त्यातील एक प्रकरण मलिकांशी संबंधित आहे. दाऊदच्या बहिणीला नवाब मलिकांनी ५५ लाख दिल्याचे ईडीकडे पुरावे आहेत. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत महाराष्ट्रातील मंत्र्याने व्यवहार करण्याचे कारण काय? जे लोक मुंबईत बॉम्बस्फोट करतात, अशांना या व्यवहारातून पैसे दिले जात असतील, तर हे अतिशय गंभीर आहे. कुठल्याही राजकीय पक्षाने राजकारण न करता, अशाप्रकाराला थारा देण्याची गरज नाही. उलट ईडीच्या कारवाईचे सर्वांनी समर्थन करायला हवे, असे फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना ठणकावले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles