Sunday, May 19, 2024

शेतीच्या वादातून चुलता-पुतण्यात हाणामारी चुलत्याचा मृत्यू

शेतीच्या वादातून चुलता-पुतण्यात तुंबळ हाणामारी, चुलत्याचा मृत्यू; धारुर पोलिस हद्दीततील घटना
धारूर: धारुर पोलीस ठाणे हद्दीतील आडस (ता.केज) येथे शेतीच्या वादातून चुलता-पुतण्यात तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी धारुर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल आहेत. यातील जखमी चुलत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ही बातमी समजताच खळबळ माजली आहे.
आडस येथील गायके परिवारात मागील काही दिवसांपासून शेती व झाडावरुन वाद सुरू आहे. या वादातून चुलते-पुतण्यात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये एकमेकांना दगड व लाकडाने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मला जमीन का देत नाही म्हणून पुतण्या संदीप यांने मारहाण केली. यावेळी भाऊ अंकुश नामदेव गायके हा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्याच्याही डोक्यात लाकडी फळी मारुन जखमी केले. अशी फिर्याद विजय नामदेव गायके यांनी दिली. त्यावरून आरोपी संदीप प्रभाकर गायके याच्या विरुद्ध (दि.26) शनिवारी धारुर पोलीस ठाण्यात कलम 326, 323, 504, 506 भादवि नुसार गुन्हा दाखल आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles