संजय राऊतांचा डोळा मुख्यमंत्री पदावर, त्यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतलीय

0
945

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊतांचे वाभाडे काढले आहेत. संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहे. यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. संजय राऊत पूर्ण राष्ट्रवादीचे आहेत. असा आरोप राणेंनी केला आहे. संजय राऊत लोकप्रभात असताना उद्धव आणि बाळासाहेब या दोघांवरही टीका करण्याचं सोडलं नव्हतं, आता म्हणतो, माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, उद्धव ठाकरेंच्या आशीर्वीदाने…तू पत्रकार नाहीच, संपादक नाही. तुझी भाषा त्या गुणवत्तेची नाहीच. बेकार आरोप करतो. हा काल अस्वस्थ का झाला, हा काल असा बेजाबदार का बोलत होता, प्रवीण राऊतने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर याचा थयथयाट झाला. असा घणाघातही राणेंनी केला आहे.