नगर शहरातील उड्डाणपुलाचे सर्व अडथळे पार करीत येत्या दिवाळी मध्ये नागरिकांसाठी वाहतुकीस हा उड्डाणपूल खुला होणार आहे. या उड्डाणपुलासाठी मी व आमदार संग्राम जगताप यांनी सर्व अडथळे दूर केले आहेत. आत्ता आम्ही दोघे जण मिळून पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर एकत्रित येत चांगला संदेश देण्यासाठी उड्डाणपुलाच्या सौंदर्यीकरणात भर घालणार आहेत मी व आमदार संग्राम जगताप स्वखर्चातून सुमारे सव्वाकोटी रुपये खर्च करून उड्डाणपुल सुशोभीकरणाचे काम येत्या एप्रिल महिन्यामध्ये सुरू करणार आहोत.अशी माहिती खा.डॉ.सुजय विखे यांनी दिली.
महाराष्ट्रातील उड्डाणपूल सुशोभीकरणाचा हा पहिला प्रयोग असून ८५ पिलरने उभारलेला हा उड्डाणपूल असून सक्कर चौक, मार्केट यार्ड चौक, चांदणी चौक या ठिकाणच्या सहा पिलरवरती निसर्गाचा संदेश देणारी प्रतिकृती उभारण्यात येणार आहे याच बरोबर ३२ पिलरवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून तर राज्याभिषेक पर्यताचा इतिहास चित्राद्वारे रेखाटला जाणार आहे.
याच बरोबर ३२ पिलरवर प्लेन रंग,राहणार असून दोन ठिकाणी अँम्पि थेटर साकारणार आहे तर एका झाडाला २० लाख रुपये खर्च येणार आहे. सदरचा खर्च हा खासदार सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप हे स्वखर्चाने करणार आहे.






