हम झुकेंगे नहीं… कारवाईच्या इशार्यानंतरही २२ हजार ग्रामसेवक संपावर ठाम

0
852

नगर: दिनांक 23 व 24 फेब्रुवारी 2022 रोजी कर्मचारी वर्गाच्या प्रलंबित मागण्या ग्रामसेवक संवर्गावर होणारे अन्यायकारक धोरण याचा निषेध करण्यासाठी उद्या दोन दिवसाचा लाक्षणिक संप आहे.या लाक्षणिक संपामध्ये फूट पाडण्यासाठी शासनाने परिपत्रक काढून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.परंतु न्याय्य हक्कासाठी आम्ही आंदोलन करत आहोत आणि करत राहणार हे सर सरकारच्या निदर्शनास आणून द्यावे लागेल ग्रामसेवकांच्या प्रश्नाच्या प्रलंबित संदर्भ बाबत जर विचार करायचा झाला तर कायम पाठपुरावा करून सुद्धा आश्वासन आपली कडे सरकार काही देत नाही.त्यामुळे आपण शंभर टक्के संप यशस्वी करू या आणि आपण नक्की कराल याचे राज्य ग्रामसेवक युनियनला खात्री आहे कोणत्याही भूलथापांना बळी न पडता ग्रामसेवक युनियन 136 चे सभासद शंभर टक्के सहभागी होतील याची मला खात्री आहे.वाघाची संघटना आहे वाघा प्रमाणेच राहणार आणि वाघा सारखेच कार्य करणार काही विघ्नसंतोषी मंडळी संपात सहभागी नसलेबाबत पत्रव्यवहार करत आहेत.हे आजच धोरण नाही कायमस्वरूपी तीस वर्षांपासून अशाच प्रकारचे धोरण हे राबवत आहेत त्याकडे दुर्लक्ष करून आपली एकच जात ग्रामसेवक जात या ध्येयाने प्रेरित होऊन आम सभासदांनी संप यशस्वी करावा.आज पर्यंत जे काही मिळवला आहे कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून फायदा झालेला आहे. आणि भविष्यात सुद्धा होत राहणार आहे राज्य सरकारची बघ्याची भूमिका तसेच राज्य सरकारचे कर्मचारी विरोधी जे धोरण आहे.ते हाणून पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी हा संप अस्मितेचा प्रश्न आहे आणि तो आपण उद्या यशस्वी करूया, असे आवाहन युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी केले आहे.*