Monday, May 20, 2024

जि.प.सदस्या हर्षदा काकडे म्हणाल्या.. तालुक्यात तथाकथित पुढाऱ्यांनमुळे उदासीनता

तालुक्यातील तथाकथित पुढाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कामे करताना अडचणी येतात : सौ.काकडे
शेवगाव प्रतिनिधी : या पाच वर्षात गटाची जी कामे व्हायला पाहिजे होती ती करता आली नाही. तालुक्यातील तथाकथित पुढाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कामे करताना अडचणी आल्या. याहून अधिक कामे करण्याची मानसिकता होती पण यावर्षी कमी निधी मिळाला त्यामुळे गटात जादा कामे करता आले नाही ही खंत वाटते असे प्रतिपादन जि.प.सदस्या सौ.हर्षदा काकडे यांनी नागलवाडी येथे केले.

आज दि.(१८) रोजी जि.प.सदस्या सौ.हर्षदा काकडे यांच्या विकास निधीतून मंजूर मौजे नागलवाडी येथे साठवण बंधारा विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबुराव खेडकर हे होते तर कार्यक्रमासाठी जनशक्तीचे उपाध्यक्ष संजय आंधळे, भाऊसाहेब सातपुते, नवनाथ खेडकर, सरपंच किरण जाधव, उपसरपंच देवराव जाधव, आबासाहेब काकडे, विकास शिंदे, रामदास विखे, मारुती वाघ, भगवान तिडके, राम गीते, रवि वडते, नरेश वडते, शिवहरी ढाकणे, संदिप गीते, अमोल ढाकणे, विष्णू ढाकणे, राजेंद्र खेडकर, संजय खेडकर, अंकुश वडते, विकास वडते, राम ढाकणे, सुनील बेलदार, कौटुंबे भाऊसाहेब आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना सौ.काकडे म्हणाल्या की, लोकप्रतिनिधींनी नाकारलेली या भागातील बंधाऱ्याची कामे झाली तर येथील ऊसतोड कामगार स्थिर होऊन सुखी झाला असता. त्यांच्या हातून कोयता हा सुटला असता. गोळेगाव तलावासाठी देखील खूप प्रयत्न केले. पण त्यातही राजकारण करून काम हाणून पाडलं. तुम्ही सुखी व्हावे ही या तथाकथित पुढाऱ्यांची मानसिकता नाही परंतु आम्ही प्रलंबित कामे मार्गी लावल्याशिवाय थांबणार नाही असेही त्या बोलताना म्हणाल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles