‘श्रीनाथ’च्या संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव करुन ठेवीदारांना ठेवी द्यावा
चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार व माजी सभापती प्रवीण कोकाटे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
नगर तालुका प्रतिनिधी- चिचोंडी पाटील,आठवड,सांडवे, दशमी गव्हाण या भागातील 911 ठेवीदारांचे जवळपास 6 कोटी रुपये श्रीनाथ पतसंस्थेत अडकले आहेत.त्यामुळे श्रीनाथ पतसंस्थेच्या संचालकांच्या मालमत्तेचा लिलाव करून या ठेवीदारांचे पैसे देण्यात यावेत अशी मागणी चिचोंडी पाटील चे सरपंच शरद पवार आणि नगर पंचायत समिती चे माजी सभापती प्रवीण कोकाटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
श्रीनाथ पटसंस्थेमध्ये चिचोंडी पाटील, आठवड,मांडवे, दशमी गव्हाण परिसरामधील 911 ठेवीदारांचे 6 कोटींपेक्षा जास्त पैसे अडकले आहेत.शेतकरी, मोलमजुर यांनी मोठया कष्टाने कमावलेला पैसे श्रीनाथ पतसंस्थेच्या चिचोंडी पाटील शाखेत ठेवले होते.पण ही पतसंस्था बुडल्याने या गरीब लोकांचा पैसा अडकून पडला आहे.अनेक वर्षे पाठपुरावा करूनही या ठेवीदारांचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे या ठेवीदारांनी आज सरपंच पवार यांची भेट घेऊन गाऱ्हाणी मांडली. त्यावेळी पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवीदारांच्या ठेवी मिळाव्या यासाठी मागणी केली आहे. यावेळी नगर पंचायत समिती चे माजी सभापती प्रवीण कोकाटे, प्रल्हाद खांदवे, रघुनाथ दळवी, दिलीप पवार, सुदाम नाकुल, जावेद आतार, बाबासाहेब पवार आदी उपस्थित होते.






