अहमदनगर सराईत गुन्हेगारांकडुन 4 चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघड, 81 ग्रॅम सोने हस्तगत

0
20

सराईत गुन्हेगारांकडुन 4 चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघड, 81 ग्रॅम सोने हस्तगत,
स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी सौ. सुवर्णा शाम मिसाळ वय 45, रा. सोनार गल्ली, लोणी बु, ता. राहाता या रस्त्याने पायी घरी जाताना पाठीमागुन काळ्या रंगाचे पल्सर मोटार सायकलवर आलेल्या अनोळखी 2 इसमा पैकी पाठीमागे बसलेल्या इसमाचे फिर्यादीचे गळ्यातील 1,50,000/- रुपये किंमतीचे 26 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र ओढून तोडून बळजबरीने चोरुन नेले बाबत लोणी पो.स्टे.गु.र.नं. 70/2024 भादविक 392, 34 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
चैन स्नॅचिंगच्या घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हेचे पथक नेमुन ना उघड चैन स्नॅचिंगचे गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव तसेच अंमलदार दत्तात्रय हिंगडे, रविंद्र कर्डीले, मनोहर गोसावी, संदीप पवार, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, भिमराज खर्से, फुरकान शेख, अमृत आढाव व मेघराज कोल्हे अशांचे पथक नेमुन ना उघड चैन स्नॅचिंग गुन्हे उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. स्थागुशा पथकाने कोपरगांव, शिर्डी, राहाता व लोणी परिसरातील चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत व घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्यामधील आरोपींचे वर्णन व गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल याच्या आधारे तपास करुन मोटार सायकलवरील इसमापैकी एक संशयीत इसम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे 1) सिताराम ऊर्फ शितल ऊर्फ गणेश भानुदास कु-हाडे वय 35 रा. चितळी स्टेशन, ता. राहाता हा असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने त्यास चितळी, ता. राहाता येथुन ताब्यात घेतले व त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने त्याचे इतर साथीदार नामे राहुल कु-हाडे व सचिन कु-हाडे दोन्ही रा. चितळी स्टेशन, ता. राहाता यांचे सोबत लोणी, राहाता व शिर्डी परिसरातुन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केले असुन चोरी केलेले सोने साथीदार नामे सचिन कु-हाडे याचेकडे ठेवले आहे असे सांगितले.
स्थागुशा पथकाने लागलीच आरोपी नामे राहुल कु-हाडे व सचिन कु-हाडे यांचा चितळी स्टेशन, ता. राहाता परिसरात शोध घेता ते मिळुन आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 2) राहुल अनिल कु-हाडे वय 19 व 3) सचिन मधुकर कु-हाडे वय 32, दोन्ही रा. चितळी स्टेशन, ता. राहाता असे सांगितले. त्यांची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत एका पिशवीत सोन्याचे दागिने मिळुन आले. त्याबाबत विचारपुस करता त्यांनी महिलांच्या गळ्यातील चोरी केलेले सोने असल्याचे सांगितल्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.