बेकायदेशीर शस्त्रे, अंमली पदार्थ, स्फोटके किंवा अशाच प्रकारच्या प्रतिबंधित वस्तूंच्या संशयावरून, कंट्रोल रूमला काही सेकंदांत सतर्क केले गेले. नाशिक शहर पोलिसांच्या ८ सीआर मोबाईल्सनी तातडीने कारवाई करत शहरभरात नाट्यमय पाठलाग सुरू केला. संशयित चालकाने पकड टाळण्यासाठी मुख्य रस्त्यांवरून वाहन चालवले, परंतु आमच्या पथकांनी कुशल रणनीती वापरून इतरांना कोणतीही इजा न होता त्याला यशस्वीपणे ताब्यात घेतले.
पाठलागात सहभागी संपूर्ण पथकाचा नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी सत्कार केला. तत्काळ पाठलाग सुरू करणाऱ्या सतर्क कर्मचाऱ्यांपैकी भाऊराव गांगुर्डे आणि बाळकृष्ण पवार यांचे विशेष कौतुक..! https://x.com/nashikpolice/status/1876672133696237744
नाशिक शहर पोलिस दलातर्फे ‘स्टॉप अँड सर्च’ मोहीम नियमितपणे राबविण्यात येते. अशाच एका अभियानात 7 जानेवारी रोजी मध्यरात्री एका कारचा पाठलाग करीत संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करीत ड्रग्ज तस्करांना पकडण्यात आले. 8 मोबाईल व्हॅन्सच्या माध्यमातून हा संपूर्ण थरार कॅमेरात कैद आहे. या कारवाईत सुमारे 28 किलो गांजा पकडण्यात आला. नाशिक पोलिसांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्त्वात भाऊराव गांगुर्डे आणि बाळकृष्ण पवार यांनी ही कारवाई केली. या मोहीमेतील सर्वांचे अभिनंदन !
–
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






