ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्युमुळे पसरलेल्या असंतोषाविषयी बोलताना ते म्हणाले की, परभणी आणि बीडमधील घटना दुर्दैवी आहेत. मात्र, परभणीसह इतर भाग शांत झाला पाहिजे. मी इथे येण्याच्या आधी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. ही परिस्थिती शांत झाली पाहिजे, याबाबत त्यांच्याशी बोललो आहे. आपले राजकीय विचार वेगळे असतील, पण महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. एकट्या मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी नाही, असं पवार म्हणाले.






