एस.टी.च्या ताफ्यात नवीन कोऱ्या बस….पण ड्रायव्हरसमोर केबिनमध्ये चढायच कसं हा प्रश्न Video

0
62

एसटी महामंडाच्या लाल रंगाच्या गाड्यांपैकी अनेक बसे खराब झाल्याने त्यांचा वापर बंद झाला आहे. अशा परिस्थितीत महामंडाळ्याच्या साठ्यात अनेक नव्या बसचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान नव्या बसची रचना अत्ंयत विचित्र पद्धतीने केली असल्याचा दावा एसटी महामंडळाच्या एका चालकाने केला आहे.

एसटी चालकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये एसटी महांमडाळीच्या ताफ्यात नव्याने समाविष्ट झालेली बस दिसत आहे. सहसा बसमध्ये चढण्यासाठी चालकच्या बाजूला एक दरवाजा असतो आणि त्या दरवाज्याच्या अगदी खालीच पायऱ्या दिल्या जातात. पण नव्या बसमध्ये सर्वकाही उलट सुलट करण्यात आल्याचे सांगितले आहे.


व्हिडीओमध्ये एसटी बसचा चालक एसटी बसची रचना कशी चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे हे दाखवतो.
चालक दाखवतो की, बसमध्ये चढण्यासाठी चालकाला पायऱ्यांची आवश्यकता असते पण नव्या बसमध्ये या पायऱ्या चक्क पुढील (जिथे चालक बसतो तिथे) चाकाच्या पुढील भागेत दिल्या आहेत पण तिथे दरवाजा दिलेला नाही. उलट दरवाजा चाकाच्या मागील बाजूला दिला आहे पण तिथे चालकाला बसमध्ये चढण्यासाठी पायऱ्याच दिलेल्या नाही. चालक पायऱ्यांवर चढतो आणि या पायऱ्या चुकीच्या ठिकाणी दिल्या आहेत हे दाखवतो तसेच तो दरवाजा उघडून दाखवतो जिथे पायऱ्याच नाही आणि म्हणतो की, तुम्हीच सांगा आता बसमध्ये चढायचे कसे”