शिवजयंती निमित्त तडीपार सराईत गुन्हेगार नगर शहरात आला अण् अडकला पोलिसांच्या जाळ्यात

0
66

शिवजयंती मिरवणुकी बंदोबस्त दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातुन 2 वर्षाकरीता हद्दपार केलेला सराईत गुन्हेगार जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची कारवाई.

मा.पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी शिवजयंती उत्सव शांततेमध्ये साजरा व्हावा याकरीता पोनि/श्री.दिनेश आहेर,स्थानिक गुन्हे शाखा यांना अहिल्यानगर शहरातील सराईत गुन्हेगारांना चेक करुन, हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्याविरूध्द कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.

पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि/थोरात व पोलीस अंमलदार संदीप पवार, गणेश लोंढे, गणेश धोत्रे, रविंद्र घुंगासे, शाहीद शेख, पंकज व्यवहारे, जालींदर माने, सागर ससाणे, रोहित येमुल, विशाल तनपुरे, भाग्यश्री भिटे व ज्योती शिंदे अशांना शिवजयंती मिरवणुक बंदोबस्त दरम्यान रेकॉर्डवरील आरोपी मिळून आल्यास कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.

दिनांक 19/02/2025 रोजी गुन्हे शाखेचे पथक अहिल्यानगर शहरामध्ये शिवजयंती मिरवणुक बंदोबस्त करत असताना पथकास बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, हद्दपार इसम नामे सुनिलसिंग जीतसिंग जुन्नी हा मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आहे.पथकाने मिळालेल्या माहितीवरून मिरवणुक मार्गामध्ये हद्दपार करण्यात आलेल्या इसमाचा शोध घेऊन तो एम.जी.रोडवरील कोहिनूर कापड दुकानासमोर मिरवणुकीमध्ये मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.त्यास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुनिलसिंग जीतसिंग जुन्नी, वय 29, रा.संजयनगर, काटवनखंडोबा, अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.आरोपीचे हद्दपार आदेशाबाबत खात्री केली असता त्यास मा.उपविभागीय दंडाधिकारी, नगर विभाग यांचेकडील आदेशान्वये दिनांक 03/04/2023 रोजी पासुन अहिल्यानगर जिल्ह्यातून 2 वर्षाकरीता हद्दपार केले आहे.नमूद आरोपी हा हद्दपार आदेशाचा भंग करुन बेकायदेशिररित्या अहिल्यानगर शहरामध्ये वास्तव्य करीत असताना मिळून आल्याने त्याचेविरुध्द तोफखाना पो.स्टे. गु.र.नं.106/2025 मपोकाक 142 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.पुढील कार्यवाही तोफखाना पोलीस स्टेशन हे करीत आहे.

सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,मा.श्री. अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.