माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मविआ सरकारच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद शहराच्या नामांतरणाचा निर्णय घेण्यात आला. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव असं करण्यात आलं. शरद पवार यांनी औरंगाबाद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत या निर्णयाबाबत आपल्याला कल्पनाच नव्हती, असं मोठं विधान केलं आहे. याशिवाय महाविकास आघाडीचं कॉमन मिनिमम प्रोगॅममध्ये याबाबत काहीच ठरलेलं नव्हतं. निर्णय घेण्यात आला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांनी आपले म्हणणे मांडले होते. पण मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम मानला जातो. म्हणून उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचा नामांतरणाचा निर्णय घेतला आणि जाहीर केला, असा धक्कादायक खुलासा शरद पवार यांनी केला आहे