कर्डिलेंना दे धक्का…भाजप तालुकाध्यक्षासह पदाधिकारी राष्ट्रवादीत दाखल

0
2340

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ना. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे पक्षाचे नेते व राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्या पुढाकाराने राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, बाळू कोबरणे, गंगाधर कोबरणे, बाळासाहेब कोबरणे, मंजाबापू कोबरणे, भाऊसाहेब कोबरणे, अंजाबापू कोबरणे यांच्यासह इतर सहकाऱ्यांचा आज पक्षप्रवेश झाला. ना. जयंत पाटील आणि ना. जितेंद्र आव्हाड यांनी सर्व मान्यवरांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.