मुख्यमंत्री पदाबाबत अमित शहा यांनी ठाकरेंना शब्द दिला नव्हता… एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

0
564

शिंदे सरकारची स्थापना झाल्यानंतर देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपाने बंद दाराआड मुख्यमंत्री पदाबाबत शब्द दिला होता का याचा सस्पेंन्स कायम आहे. याबाबत आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री पदाबाबत असा कोणताही शब्द अमित शाह यांनी दिला नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात सांगितले आहे. ज्या मुद्यावरुन भाजप आणि शिवसेनेची युती संपुष्टात आली त्यावरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौप्यस्फोट केला आहे. शिवाय बिहारमध्ये कमी संख्याबळ असताना देखील नितीशकुमार यांना मुख्यमंत्री पद दिले गेले होते की असा निर्वाळाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जर आम्ही बिहारमध्ये नितीशकुमार यांचे आमदार कमी असताना त्यांना मुख्यमंत्री बनवू शकतो शिवाय तुमचे 50 आणि भाजपाचे 106 असताना आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करु शकतो तर आम्ही शब्द दिला असता का फिरवला असता असे स्पष्टीकरण गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.