रिझर्व्ह बँकेचा दणका, ‘या’ सहकारी बँकेचा परवाना रद्द

0
886

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेकडून राज्यातील आणखी एका सहकारी बँकेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने सांगलीच्या सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेकडे व्यवहारासाठी पर्याप्त भांडवल नसल्यामुळे आरबीआयने या बँकेचा परवाना रद्द केला आहे. आयबीआयने दिलेल्या माहितीनुसार बँकेकडे व्यवहारासाठी पर्याप्त भांडवल नसल्यामुळे तसेच आरबीआयने घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेचा परवाना रद्द करण्यात आल्यामुळे आता या बँकेला यापुढे कोणताही आर्थिक व्यवहार करता येणार नाही. बँकेवर अचानक कारवाई झाल्यामुळे खातेदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.