नाशिक – आदिवासी विकासच्या बांधकाम विभागातील लाचखोर संशयित कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल तब्बल २८ लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पकडलं लाचलुचप्रत प्रतिबंधक विभागाने ने नाशिकमध्ये खूप मोठी कारवाई करत तब्बल २८ लाख रुपयांची लाच घेताना आदिवासी विभागाच्या एका मोठ्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडले आहे. दिनेशकुमार बागुल असे एसीबीने अटक केलेल्या आदिवासी अभियंत्याचे नाव आहे. बागुल यांनी सेंट्रल किचन बिल मंजुरीसाठी २८ लाखांची लाच मागितली होती. त्यानंतर एसीबीने सापळा रचून अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली. बागुल यांची नाशिकमध्ये शेकडो कोटींची बेहिशेबी संपत्ती असल्याचा संशय एसीबीने व्यक्त केला आहे.






