दिल्लीगेट परिसरात ‘गन्ना चाय’चे शानदार उद्घाटन, ऊसाचे विविध उत्पादने उपलब्ध

0
920

आरोग्यदायी व शुगर फ्री ऊसाच्या रसाचा चहा सर्वांच्या पसंतीस उतरेल : आ.संग्राम जगताप
दिल्लीगेट परिसरात ‘गन्ना चाय’चे शानदार उद्घाटन, ऊसाचे विविध उत्पादने उपलब्ध
नगर (सचिन कलमदाणे) : आताच्या काळात नाविन्यपूर्ण व्यवसाय सुरु करून त्यात अनेक जण यश मिळवत आहे. दिल्लीगेट परिसरात गन्ना चायच्या रुपाने असाच एक वेगळा व्यवसाय सुरु झाला आहे. यात साखर, गूळ, पाणी न वापरता ऊसाच्या रसाचा चहा उपलब्ध करून दिला आहे. पूर्णत: सेंद्रीय व कोणतेही केमिकल नसलेला हा चहा प्रत्येकाला नक्कीच आवडेल. आरोग्यासाठीही हा चहा उपयुक्त ठरणारा आहे. चहाबरोबर ऊसाच्या रसापासून तयार केलेले आईस्क्रिम, जाम, जेली, इमली चटणी असे पदार्थ नगरकरांच्या पसंतीस उतरतील, असा विश्वास आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.
श्री रविंद्र नवले व श्री संपत हिंगे या व्यावसायिक मित्रांनी दिल्लीगेट परिसरात सुरु केलेल्या “गन्ना चाय” दालनाचे उद्घाटन आ.जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी शुभेच्छा देताना ते बोलत होते. या कार्यक्रमास ऍड. युवराजभाऊ शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, नगरसेवक श्याम नळकांडे, संपादक रामभाऊ नळकांडे, नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक किरण कातोरे, उद्योजक महेश डाके, माजी नगरसेवक ऍड.धनंजय जाधव, उद्योजक श्रीनिवास रासकोंडा, अमोल सुरसे, ऋषीकेश चाफे, लॅपविन टेक्नॉलॉजीचे अजित पालवे, यशस्वी टेक्नॉलॉजीचे दत्ता फलके, सेलिब्रेटिंग एज इंटरनॅशनलच्या संचालक स्वाती सोनार, फॅट टू फिटचे सनी खैरे व प्रियंका खैरे,सूरज भाऊ नवले
(संचालक – आगम क्लिनिकल लेबोरेटरी अ-नगर ),
गणेश यंगुल (फिटवेल टेलर) ,उमेश बांगर
(संचालक -अष्टविनायक क्लिनिकल लेबोरेटरी जामखेड़), डॉ. अक्षय फिरोदिया (संचालक – आगम हॉस्पिटल अ- नगर ) प्रविणा ऍडस व दिना मिडिया सर्व्हिसेस (संगमनेर)चे संचालक रविंद्र नवले, प्रविणा नवले, लॅपवर्ड टेक्नॉलॉजीचे संपत हिंगे आदी उपस्थित होते.
स्वाती सोनार यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी गन्ना चाय हे मोठे क्रांतीकारक ठरणार आहे. पूर्णत: ऊसापासून तयार होणारा चहा तसेच कॉफी, चुस्की, सेंद्रीय गूळ, गन्ना आईस्क्रिम, गन्ना फ्रोझन ज्युस, गन्ना जाम, जेली, गन्ना जलेबी, गन्ना इमली चटणी, काकवी याठिकाणी उपलब्ध आहे. नगरमध्ये पहिलेच दालन सुरु केले असून भविष्यात सर्वत्र फ्रँचाईसी रूपाने पोहचण्याचा प्रयत्न आहे. यातून ऊसाला एक वेगळे मार्केट तयार होवून शेतकर्‍यांचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. रविंद्र नवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संपत हिंगे यांनी आभार मानले.